चिकन भुना मसला: चिकन भुना मसाला ही एक टेस्टी डिश आहे. चिकन भुना मसाला आपण पार्टीला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. अशा प्रकारची डिश बनवतांना चिकनचे छातीचे तुकडे व लेग पीस वापरावेत ते टेस्टी लागतात. चिकन मसाला बनवायला अगदी सोपा आहे व चवीस्ट आहे. तसेच ह्यामध्ये खवा, काजू पेस्ट व टोमाटो प्युरी वापरलेली आहे.
The English language version of the same Chicken Gravy recipe and the preparation method can be seen here – Chicken Bhuna Masala Gravy
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
८ चिकनचे मोठे तुकडे
चिकन मुरण्यासाठी:
२ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून कसुरी मेथी
२ टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर
१/२ कप दही
मीठ चवीने
मसाला बनवण्यासाठी:
१ टे स्पून बटर
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१/४ कप खोया
२ मोठे टोमाटो
१०-१२ काजू (भिजवून)
२ टे स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून कसुरी मेथी
मीठ चवीने
तेल चिकन तळण्यासाठी
कृती:
चिकनचे तुकडे धुवून एका बाऊलमध्ये मध्ये ठेवा मग त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, कश्मीरी लाल मिरची पावडर, दही, कसुरी मेथी, मीठ घालून मिक्स करून एक तास झाकून बाजूला ठेवा,
काजूचे तुकडे पाण्यात 30 मिनिट भिजत ठेवा मग वाटून घ्या. टोमाटो उकडून, साले काढून मिक्सरमध्ये वाटुन घ्या. खवा किसून घ्या.
कढईमधे तेल गरम करून चिकनचे तुकडे गुलाबी रंगावर तळून घ्या. मग चिकनचे तुकडे बाजूला ठेवा.
कढईमधे बटर गरम करून त्यामध्ये आले-लसूण पेस्ट एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो पेस्ट घालून खवा घाला व चांगले ५-७ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला,मीठ, एक कप पाणी घालून मिक्स करून २-३ मिनिट मसाला शिजल्यावर त्यामध्ये तळलेले चिकनचे तुकडे घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या.
गरम गरम चिकन भुना मसाला पराठा बरोबर किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करा.