Schezwan Chakli Chaat Recipe in Marathi

Schezwan Chaat
Schezwan Chakli Chaat

शेजवान चकली चाट: शेजवान चकली चाट हा वेगळ्या प्रकारचा चाट आहे. दिवाळीच्या फराळातील जर चकली उरली तर अश्या प्रकाराचा चाट बनवता येतो. शेजवान चकली चाट बनवतांना कांदा, बीन्स, शिमला मिर्च, गाजर वापरले आहे.

The English language version of this Chaat recipe and its preparation method can be seen here – Schezwan Chakli Chaat

बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
८ चकल्या
१ मध्यम आकाराचा कांदा
१ कप पत्ता कोबी
१ कप गाजर
१ कप श्रावण घेवडा
१ कप शिमला मिर्च
२ टे स्पून शेजवान सॉस
मीठ चवीने
१ टे स्पून तेल

Schezwan Chaat
Schezwan Chakli Chaat

कृती:
कांदा उभा पातळ चिरून घ्या. कोबी, गाजर, बीन्स, शिमला मिर्च धऊन उभी पातळ चिरून घ्या. चकलीचे २” आकाराचे तुकडे करून घ्या.

पसरट कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये प्रथम कांदा थोडासा परतून घ्या. मग चिरलेल्या भाज्या घालून अगदी थोडेसे मीठ घालून २ मिनिट भाज्या परतून घ्या. भाज्या जास्त शिजता कामा नये नाहीतर चव बदलेल.

भाज्या परतून झाल्यावर त्यामध्ये शेजवान सॉस घालून अर्धा मिनिट परतून घेऊन चकलीचे तुकडे घालून एक मिनिट गरम करून घ्या.

गरम गरम शेजवान चकली चाट सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.