स्ट्रॉबेरी कस्टर्ड अँपल पुडिंग: स्ट्रॉबेरी कस्टर्ड अँपल पुडिंग ही जेवणा नंतर डेझर्ट म्हणून द्यायला छान डीश आहे. हे डेझर्ट बनवतांना शेवया, स्ट्रॉबेरी पल्प, सीताफळाचा गर व दुध वापरले आहे. हे पुडिंग चवीला फार छान लागते.
The English language version of the same Pudding recipe and preparation method can be seen here – Delicious Strawberry Custard Apple Pudding
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१/२ लिटर दुध
१/२ कप साखर
१/४ कप शेवया
२ टे स्पून स्ट्रॉबेरी पल्प
२ टे स्पून सीताफळ गर
१ टी स्पून वेलची पूड
कृती:
दुध गरम करून १० मिनिट मंद विस्तवावर उकळून घ्या. त्यामध्ये साखर घालून परत १० मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या. म्ह शेवया घालून ५-७ मिनिट शेवया शिजवून घ्या.
थंड झाल्यावर त्यामध्ये सीताफळाचा गर, स्ट्रॉबेरीचा पल्प, वेलचीपूड घालून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
टीप: दुध गरम असतांना स्ट्रॉबेरी पल्प घालू नये कारण की स्ट्रॉबेरी थोडी आंबटगोड असते त्यामुळे दुध नासण्याचा संभाव असतो. म्हणून दुध थंड झाल्यावर स्ट्रॉबेरी पल्प घालावे.