पहाडी चिकन: पहाडी चिकन ही ए1 क छान चवीस्ट डीश आहे. पहाडी चिकन आपण दुपारी किंवा रात्री जेवणात बनवू शकतो. हे चिकन पौस्टिक आहे कारण ह्यामध्ये पालक. शेपू, पुदिना वापरला आहे.
The English language version of this Pahadi Murgh recipe and its preparation method can be seen here – Pahari Murgh
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४-५ जणासाठी
साहित्य:
१ किलो ग्राम चिकन
१/२ कप दही
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
६-७ हिरव्या मिरच्या (वाटुन)
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून काळे मीठ
१ कप ताजा पालक (पेस्ट)
१ कप शेपू (चिरून)
१/२ टी स्पून मीठ
१ कप कोथंबीर (चिरून)
१ कप पुदिना (चिरून)
१ टी स्पून जिरे (पावडर)
२ टे स्पून तेल
१ टे स्पून चाट मसाला
१ टे स्पून अमूल बटर
कृती:
पालक भाजीची पाने धुवून, उकडून मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या. शेपू, कोथबीर, पुदिना धऊन बारीक चिरून घ्या. जिरे थोडे गरम करून बारीक वाटुन घ्या.
चिकनचे तुकडे धऊन त्याला दही लाऊन १५-२० मिनिट बाजूला ठेवावे. त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्याची पेस्ट, गरम मसाला, काळे मीठ, पालक पेस्ट, शेपू, साधे मीठ, कोथंबीर, पुदिना, जीरा पावडर, तेल मिक्स करून ठेवणे.
कढई गरम करून त्यामध्ये चिकन घालून कढई वरती झाकण ठेवून चिकन चांगले शिजवून घ्या.
चिकन शिजलेकी चिकनला स्मोक फ्लेवर द्यावा. (एका वाटीमध्ये जळका कोळसा ठेवून त्यावर २-३ थेंब तेल व १/४ टी स्पून गरम मसाला घालून वाटी शिजलेल्या चिकनच्या कढईमधे ठेवावी व कढईवर झाकण ठेवून २-३ मिनिट तसेच ठेवावे म्हणजे चिकनला स्मोक फ्लेवर येतो.)
चिकनला स्मोक फ्लेवर दिल्यावर चिकनमध्ये चाट मसाला व बटर घालून मिक्स करून चपाती बरोबर सर्व्ह करावे.