स्प्रिंग रोल डोसा: स्प्रिंग रोल डोसा ही नाश्त्याला किंवा जेवणाच्या वेळी सुद्धा बनवू शकतो. लहान मुलांना अश्या प्रकारचा डोसा फार आवडेल. आपण नेहमी बटाट्याची भाजी घालून मसाला डोसा बनवतो. आता डोश्यामध्ये भाज्यांचे सारण भरून बघा किती चवीस्ट लागतो. परत ह्यामध्ये भाज्या वापरल्यामुळे पोट सुद्धा भरते. ह्या भाजी मध्ये शिजवलेल्या न्युडल्स सुद्धा छान लागतात.
The English language version of the same Dosa recipe and its preparation method can be seen here – Spring Roll Dosa
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४ डोसे बनतात
डोसा बनवण्यासाठी साहित्य:
३ कप डोश्याचे पीठ
मीठ चवीने
तेल डोसे भाजण्यासाठी
सारणासाठी साहित्य:
२ पातीचे कांदे (उभा पातळ चिरून)
२ कप कोबी (उभा पातळ चिरून)
२ मध्यम शिमला मिर्च (उभी पातळ चिरून)
२ मध्यम आकाराचे गाजर (उभे पातळ चिरून)
१/४ कप कांदा पात (बारीक चिरून)
२ टे स्पून सोय सॉस मीठ चवीने
१ टे स्पून तेल
कृती:
सारणासाठी: पातीचा कांदा, कोबी, शिमला मिर्च, गाजर उभे पातळ चिरून घ्या.
कढईमधे तेल गरम करून चिरलेला कांदा एक मिनिट परतून घेऊन बाकीच्या चिरलेला भाज्या घालून मोठ्या विस्तवावर २-३ मिनिट परतून घेऊन मग त्यामध्ये मीठ व सोया सॉस घालून मिक्स करून सारण बाजूला थंड करायला ठेवा.
नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवून त्यावर एक टी स्पून तेल लाऊन ३/४ कप डोश्याचे मिश्रण तव्यावर पसरवून कडेनी थोडे तेल सोडा. मग तयार डोश्यावर तयार केलेले १/४ सारण डोश्यावर मध्य भागी ठेवून डोसा मुडपून घ्या.
गरम गरम स्प्रिंग डोसा टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.