पारंपारिक कोकणी डाळीची आमटी: कोकणी डाळीची आमटी बनवतांना डाळ शिजवताना कांदा, टोमाटो, हिरवी मिरची घालतात तसेच खोवलेला नारळ मिक्सर मध्ये बारीक वाटुन घालतात त्यामुळे छान टेस्ट येते.
The English language version of this Konkani Amti recipe and preparation method can be seen here – Toor Dal Curry
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप तुरडाळ,
२ हिरव्या मिरच्या
२ टे स्पून टोमाटो
२ टे स्पून कांदा
१ छोट्या शेवग्याच्या शेगाचे तुकडे
१/२ कप ओला नारळ
१/४ कप कोथंबीर
फोडणी करीता:
१ टी स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
६-७ कडीपत्ता पाने
मीठ चवीने
कृती:
कांदा, टोमाटो, कोथंबीर चिरून घ्या. हिरव्या मिरचीचे उभे दोन तुकडे करा. ओला नारळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
तुरडाळ धुऊन घ्या. मग त्यामध्ये १ १/२ पाणी, चिरलेला कांदा, टोमाटो, हिरवी मिरची घालून कुकर मध्ये तीन शिट्या काढून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, शेवग्याच्या शेगाचे तुकडे व थोडे पाणी घालून २-३ मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये हळद, मीठ, शिजवलेला डाळ, वाटलेला नारळ घालून चांगली उकळी आणा मग वरतून कोथंबीर घालून गरम गरम भाता बरोबर सर्व्ह करा.