कोल्हापुरी लाल मिरचीच्या ठेचा: कोल्हापूर मटणाचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हा खूप लोकप्रिय आहे. तसेच तेथील लाल मिरचीचा ठेचा पण खूप लोकप्रिय आहे. लाल मिरचीचा ठेचा बनवतांना लाल मिरची, लसूण, शेगदाणे व वरतून छान खमंग फोडणी घातली आहे.
The English language version of the same Thecha recipe and its preparation method can be seen here – Kolhapuri Lal Mirchi Thecha
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५-30 लाल कोल्हापुरी मिरची
८-१० लसूण पाकळ्या
१/४ कप शेंगदाणे
फोडणी साठी:
२ टे स्पून तेल
१/२ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
मीठ चवीने
कृती: कोमट पाण्यात लाल मिरची एक तास भिजत ठेवा म्हणजे ती मऊ होईल. पाण्यामधून मिरची बाहेर काढून मग मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या. मग त्यामध्ये लसूण, मीठ, शेंगदाणे घालून परत जाडसर वाटून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी व हिंग घालून चांगली खमंग फोडणी करा व त्यावर वाटलेली मिरची घालून मिक्स करून थोडे परतून घ्या.
कोल्हापुरी लाल मिरचीचा ठेचा चपाती, पराठा, ब्रेड व डोसा ह्या बरोबर चवीस्ट लागतो.