Konkani Style Mutton Lonche Recipe in Marathi

Konkani Meat Pickle
Konkani Style Mutton Lonche

कोकणी पद्धतीचे मटणाचे लोणचे: कोकणी पद्धतीचे हे पारंपारिक लोणचे आहे. हे लोणचे तयार झाल्यावर थंड करून फ्रीज मध्ये ठेवावे मग ते एक महिना चांगले रहाते. मटणाचे लोणचे हे कमी वेळात बनवता येते व कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर असे बनवलेले लोणचे झुणका-भाकरी बरोबर सर्व्ह करता येते.

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १ किलो ग्राम बनते

साहित्य:
१ किलो ग्राम मटन
३ टी स्पून धने (थोडे घसटून)
३ टी स्पून जिरे (थोडे घसटून)
३ टी स्पून मोहरी
१ टी स्पून हळद
१ टे स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
२ टी स्पून साखर
३ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ कप व्हेनीगर
१ कप तेल

Konkani Meat Pickle
Konkani Style Mutton Lonche

कृती:
प्रथम मटणाचे तुकडे चांगले धुवून घ्या. एका कढाईमध्ये तेल गरम करून आले-लसूण पेस्ट, धने, जिरे, मोहरी, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, साखर, व्हेनीगर, मटणाचे तुकडे मिक्स करून घेऊन मंद विस्तवावर कढई ठेवा. कढाईवर स्टीलची प्लेट ठेवून त्या प्लेट वरती पाणी घालून मंद विस्तवावर मटन ४०-४५ मिनिट शिजू द्या.
मटणाचे लोणचे थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवा, लागेल तसे लोणचे काढून घ्या. मग चपाती बरोबर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.