कुरकुरीत चिकन क्रँकर्स: चिकनचे आपण बरेच प्रकार बघितले तर अजून एक चिकनचा छान स्वादीस्ट प्रकार बघणार आहोत. कुरकुरीत चिकन क्रँकर्स बनवण्यासाठी साधारणपणे कबाब सारखीच पद्धत आहे. पण ह्यामध्ये आवरण जरा थोडे वेगळे आहे. आवरणासाठी रवा वापरला आहे व तो शिजवून घेतला आहे त्यामुळे क्रँकर्स छान कुरकुरीत होतात व सारणा साठी बोनलेस चिकन वापरले आहे. किंवा आपण चिकन खिमा सुद्धा बनवून वापरू शकतो.
The English language version of the same Chicken Starters Snack recipe and its preparation method can be seen here – Crispy and Delicious Chicken Crackers
बनवण्यासाठी वेळ:
४५ मिनिट
वाढणी:
८-१० क्रँकर्स
साहित्य:
सारणासाठी: चिकन भिजवून ठेवण्यासाठी:
१०० ग्राम बोनलेस चिकन
१ टे स्पून आले-लसूण (बारीक चिरून)
१ टी स्पून मिरे पावडर (जाडसर)
मीठ चवीने
आवरणासाठी:
२ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून,सोलून, किसून)
१ कप दुध
१ कप बारीक रवा
१ टी स्पून जिरे
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ टी स्पून आले-लसूण (बारीक चिरून)
१ टी स्पून मिरे पावडर (जाडसर)
मीठ चवीने
२-३ ब्रेड स्लाईस (क्रम)
तेल क्रँकर्स तळण्यासाठी
कृती: चिकन भिजवण्यासाठी: चिकनचे तुकडे धऊन घेऊन आयताकृती आकाराचे कापून घ्या मग त्यामध्ये आले-लसूण, मिरे पावडर मीठ मिक्स करून २०-३० मिनिट झाकून ठेवा.
आवरणासाठी: दुध गरम करायला ठेवा मग त्यामध्ये जिरे, आले=लसूण, हिरवी मिरची घालून बारीक रवा घाला व मिक्स करून मधून मधून ढवळत रहा. म्हणजे रवा चांगला शिजेल. रवा शिजल्यावर त्यामध्ये मीठ, किसलेला बटाटा, मिरे पावडर घालून मिश्रण परातीत काढून घ्या. मग रव्याचे मिश्रण चांगले मळून घ्या.
मळलेल्या रव्याच्या पीठाचे एक सारखे ८-१० लांबट आकाराचे गोळे बनवा. गोळे बनवतांना त्यामध्ये चिकनचे तुकडे घालून गोळा चांगला बंद करा. प्रतेक गोळ्याला तेलाचा हात लावा व एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम घेऊन एक एक गोळा ब्रेड क्रम मध्ये घोळून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घेऊन चिकनचे छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम चिकन क्रँकर्स सर्व्ह करा.