माहीमी हलवा: माहीमी हलवा हा एक छान गोड पदार्थ आहे. बनवायला अगदी सोपा व सणावाराला बनवण्यासाठी चांगला आहे. लहान मुलांना माहीमी हलवा खूप आवडतो. ह्या मध्ये वेगवेगळे रंग वापरून सुद्धा बनवता येतो तसेच दिसायला सुद्धा आकर्षक दिसतो.
The English language version of this Maharashtrian Mithai recipe and its preparation method can be seen here – Mahim Halwa
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी : १२-१५ तुकडे बनतात
साहित्य:
१ कप मैदा
३ कप साखर
३ कप डालडा तूप
१ कप पाणी
७-८ वेलची
४-६ बदाम (पातळ तुकडे करून)
थोड्या चारोळ्या
२-३ थेंब आपल्या आवडेल तो रंग
कृती:
प्रथम मैदा चाळून घ्यावा. डालडा थोडा पातळ करून घ्या. मग मैदा, साखर, पाणी मिक्स करून घेऊन त्यामध्ये एक कप पातळ डालडा घालून एकत्र करून मिश्रण मंद विस्तवावर घट्ट होई परंत ढवळत रहावे. ढवळत रहातांना मधून मधून तूप घालत रहावे. जो परंत मिश्रण घट्ट होऊन तूप सुटत नाही तो परंत ढवळत रहावे.
मिश्रण घट्ट झाले की गरम गरम मिश्रण स्टीलच्या थाळीवर पातळ थर पसरवून त्यावर वेलची दाणे, बदामाचे पातळ काप व चारोळी पसरवावी व नंतर त्याचे मध्यम आकारचे तुकडे कापावे. चौकोनी तुकडे कापले की एक तुकडा घेऊन त्यावर त्याच्या आकाराचा बटर पेपर ठेवून त्यावर दुसरा माहामी हलवा ठेवावा परत बटर पेपर ठेवावा अश्या प्रकारे सर्व तुकडे एकावर एक असे ठेवावे.
रंग वापरायचा असेल तर थोड्या मिश्रणात रंग घालून मिक्स करून घ्या. मग मिश्रण दुसऱ्या थाळीवर थापावे.