मटर पुलाव: थंडीच्या दिवसात मटार हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. हिरव्या ताज्या मटार पासून आपल्याला अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात. हिरव्या ताज्या मटार पासून मटर पुलाव बनवता येतो तो चांगला टेस्टी लागतो. घरी सणावारी किंवा मुलांच्या पार्टीला बनवायला छान आहे.
The English language version of the same Maharashtrian Pulao-Bhat recipe and its preparation method can be seen here – Fresh Grean Peas Pulao
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
१ १/२ कप हिरवे ताजे मटार
१५-२० किसमिस
८-१० काजू तुकडे
मीठ चवीने
पुलावसाठी मसाला:
४ लवंग
२ हिरवे वेलदोडे
१/२” दालचीनी (तुकडा)
१ टी स्पून खसखस
फोडणी साठी:
१ टे स्पून तूप
१ टी स्पून शहाजिरे
६-७ मिरे
२ तमलपत्र
१ मध्यम कांदा (चिरून)
कृती:
तांदूळ धुवून एक तास बाजूला ठेवा. मिरे, हिरवे वेलदोडे, दालचीनी बारीक वाटुन घ्या.
कुकरमध्ये तूप गरम करून घेऊन त्यामध्ये शहाजिरे, मिरे, दालचीनी, तमालपत्र, कांदा, हिरवे मटार घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये तांदूळ घालून २-३ मिनिट परतून घ्या.
तांदूळ परतून झाल्यावर त्यामध्ये बारीक केलेला गरम मसाला, खसखस, धने-जिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून घेऊन ४ कप गरम पाणी घालून मिक्स करून कुकरचे झाकण लाऊन दोन शिट्या काढा.
कुकर थंड झाल्यावर झाकण काढून गरम गरम मटर भात सर्व्ह करा.
मटर पुलाव सर्व्ह करतांना वरतून खोबरे व कोथंबीर घालून सजवा.