क्रिस्पी टेस्टी चिकन खिमा सामोसा: क्रिस्पी टेस्टी चिकन खिमा सामोसा हा जेवणात, पार्टीला किंवा स्टारटर म्हणून सुद्धा बनवायला छान आहे. चिकन खिमाचे सामोसे किंवा रोल सुद्धा बनवता येतात. पार्टीला जर बनवायचे असतील तर सामोसा बनवण्या आयवजी रोलचा आकार दिला तर टेबलावर दिसायला पण छान दिसते, फक्त ते तळताना मंद विस्तवावर तळावेत म्हणजे आतून कच्चे रहाणार नाहीत.
The English language version of the same Keema Samosas recipe and its preparation method can be seen here – Tasty Chicken Samosas
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५ सामोसे
सामोसाच्या सारणसाठी:
२५० ग्राम चिकन खिमा
१ मोठा कांदा (चिरून)
१“आले तुकडा
१२-१५ लसूण पाकळ्या
२-३ हिरव्या मिरच्या
१/२ कप कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टे स्पून तंदुरी चिकन मसाला
१ टी स्पून लिंबूरस
१२-१५ पुदिना पाने
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
आवरणासाठी:
२ कप मैदा
२ टे स्पून तेल (गरम मोहन)
मीठ चवीने
तेल सामोसे तळण्याकरता
कृती:
आवरणासाठी: मैदा चाळून घ्या. मग त्यामध्ये मीठ, गरम तेल घालून मिक्स करून थोडे पाणी वापरून घट्ट पीठ मळून घ्या. मळलेले पीठ २५-30 मिनिट बाजूला ठेवा.
सारणासाठी: चिकन खिमा धुवून बाजूला ठेवा. कांदा चिरून घ्या, आले-लसूण-मिरची-कोथंबीर बारेक वाटून घ्या. पुदिना पाने चिरून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्टघालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये चिकन खिमा, हळद, लाल मिरची पावडर, मीठ घालून १० मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. मग त्यामध्ये १/४ कप पाणी घालून कढईवर झाकण ठेवावे व ५-७ मिनिट चिकन शिजवून घ्या. कढई वरची प्लेट काढून त्यामध्ये तंदुरी चिकन मसाला, लिंबूरस व चिरलेली पुदिना पाने घालून मिक्स करून घ्या व चिकन खिमा थोडा कोरडा होई परंत शिजवून घेऊन थंड करायला बाजूला ठेवा.
सामोसा बनवण्यासाठी: मळलेल्या पीठाचे एक सारखे ७-८ गोळे बनवा. एक गोळा घेऊन चपाती सारखा गोल लाटून घ्या व त्याचे सुरीने कापून दोन भाग करा. एक भाग घेऊन तो त्रिकोणा सारखा मुडपून घेऊन त्यामध्ये एक टे स्पून चिकन खिम्याचे सारण भरून सामोसा बंद करा. अश्या प्रकारे सर्व सामोसे बनवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घेऊन मंद विस्तवावर छान कुरकुरीत सामोसे तळून घ्या.
गरम गरम चिकन खिमा सामोसे सर्व्ह करा.