झणझणीत कवठाचा -Wood Apple-Bael Fruit ठेचा: ठेचा म्हंटले की आपल्या डोळ्या समोर लाल मिरची, हिरवी मिरची व लसणाचा ठेचा समोर येतो. कवठाचा ठेचा हा चवीस्ट लागतो व भाकरी बरोबर छान लागतो. कवठालाच बेलफ्रुट सुद्धा म्हणतात. आपण महाशिवरात्री ह्या दिवशी कवठ अगदी आवर्जून आणतो कारण भगवान शंकर यांचे प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो.
कवठ हे आपल्या प्रकृतीला लाभ दायक आहे कारण की ह्याच्या सेवनाने पिक्त कमी होते. भूक लागते. तसेच ह्या मुळे क्षय, उलटी, श्रम ह्या विकारांना बरे करते.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जण
साहित्य:
२ मोठी कवठे
१०-१२ लाल मिरच्या
१ टे स्पून जिरे पावडर
१/२ टी स्पून हळद
१/२ टी स्पून हिंग
मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
कृती:
कवठ फोडून त्यामधील गर काढून घ्या. मग कवठाचा गर, लाल मिरच्या, हिंग, हळद, जिरेपूड, मीठ सर्व मिश्रण पाट्यावर कुटून घ्या. मग कुटलेला ठेचा काचेच्या बरणीत भरून ठेवा. आपल्याला पाहिजे तेव्हा हा ठेचा बरणीतून काढून एका बाऊल मध्ये ठेवा व वरतून चवीला साखर घालून मिक्स करून गरम तेलाची फोडणी घालून गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा. कवठाचा ठेचा ८-१५ दिवस फ्रीजमध्ये छान टिकतो. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रीज मधून काढून साखर व तेलाची फोडणी घालून मिक्स करून भाकरी बरोबर सर्व्ह करावा.