गाजराची भाजी: हिवाळा सीझन चालू झाला की बाजारामध्ये सर्वत्र लाल किंवा केशरी गाजरे मिळतात. पण आजकाल वर्षभर सुद्धा उपलब्ध असतात. गाजर हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गाजर ही निसर्गाकडून आपल्याला मिळालेली अमूल्य भेट आहे. गाजर हे शक्तीचा भंडार आहे.
The English language version of the same vegetable preparation can be seen here – Gajar Ki Sabji
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम गाजर
१/४ कप ओला नारळ (खोऊन)
१ टी स्पून लिंबूरस
२ हिरव्या मिरच्या
मीठ व साखर चवीने
१ टे स्पून चणाडाळ
१ टे स्पून तेल
कृती:
गाजरे धऊन स्वच्छ करून त्याच्या गोल गोल चकत्या कापाव्यात. कुकरमध्ये गाजराच्या चकत्या, चणाडाळ व बुडेल एव्ह्डे पाणी घालून शिजवून घ्या. कुकर उघडल्यावर शिजवलेले गाजर बाजूला ठ्वावे.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये शिजवलेल गाजर, ओला नारळ, हिरव्या मिरच्या, मीठ घालून १/२ कप पाणी घालून चांगली वाफ आणावी. गाजराची भाजी शिजल्यावर त्यामध्ये लिंबूरस व साखर घालून मिक्स करून भाजी चपाती बरोबर सर्व्ह करावी.