अंडा करी- ग्रेवी साऊथ इंडियन स्ताईल: आपण वेगवेगळ्या पद्धतीने अंडा करी बनवतो. म्हणजे प्रतेक प्रांतामध्ये वेगवगळी पद्धत असते. साऊथ इंडियन स्ताईल अंडा करी ही टेस्टी लागते. ती बनवताना ओला नारळ वापरला आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ३-४ जणासाठी
साहित्य:
१ मोठा नारळ (खोऊन)
१ मोठा कांदा (किसून)
१” आले तुकडा
३ हिरव्या मिरच्या
१२-१५ लसूण पाकळ्या
४ टे स्पून तूप किंवा बटर
१ टी स्पून हळद
१ टे स्पून कॉर्नफ्लोर
१/२ कप दुध
मीठ चवीने
२ टे स्पून व्हेनीगर
२ टे स्पून लिंबूरस
६ अंडी (उकडून)
कृती: ओला नारळ किसून घ्या, मग १/२ कप गरम पाण्यात १० मिनिट भिजत ठेवून, त्याचे दाबून दुध काढून गाळून घ्या. परत १/२ कप पाण्यात नारळ १० मिनिट भिजवून दुध काढून गाळून घेऊन बाजूला ठेवा.
कांदा सोलून चिरून घ्या. आले सोलून उभा पातळ चिरा. हिरवी मिरची चिरून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून चिरलेला कांदा, लसून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची व आले घालून रंग बदले परंत परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, कॉर्नफ्लोर घालून एक मिनिट परतून घेऊन त्यामध्ये दुध व नारळाचे दुसरे दुध घालून मिक्स करून एक मिनिट चांगली उकळी येवू द्या. उकळी आल्यावर त्यामध्ये पहिले नारळाचे दुध, मीठ घालून २-३ मिनिट उकळी आल्यावर लिंबूरस, व्हेनीगर घालून उकडलेली अंड्याचे दोन तुकडे करून करी मध्ये घाला.
गरम गरम अंडा करी पराठा बरोबर किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करा.