सुका मेवाचे चिकन खिमा कबाब: आता परंत आपण बऱ्याच प्रकारचे कबाब बघीतले. आता आपण चिकन खिमा कबाब मध्ये ड्राय फ्रुट भरून केलेले आहेत. अश्या प्रकारचे कबाब घरी पार्टीला किंवा साईड डीश म्हणून सुद्धा केले जातात.
The English language version of the same Mughlai Style Kebab recipe and its preparation method can be seen here – Chicken Keema Kebab with Dry-Fruit Filling
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५ कबाब
आवरणासाठी:
५०० ग्राम चिकन खिमा
१ टे स्पून तूप
१” आले तुकडा
१०-१२ लसूण पाकळ्या
१ मध्यम आकाराचा (कांदा)
२ हिरव्या मिरच्या
१ अंडे (फेटून)
१ ब्रेड स्लाईस
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून ताजी साय (क्रीम)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
तूप कबाब तळण्यासाठी
सारणासाठी:
५-६ बदाम (तुकडे करून)
४-५ आक्रोड (तुकडे करून)
७-८ काजू (तुकडे करून)
४-५ पिस्ता (तुकडे करून)
१ टे स्पून चारोळी
कृती: कांदा व कोथंबीर बारीक चिरून घ्या. आले-लसून-हिरवी मिरची वाटून घ्या. ब्रेडच्या स्लाईसला क्रीम लावून ठेवा. चिकन खिमा धुऊन निथळत ठेवा. अंडे फेटून घ्या.
आवरणासाठी: कढईमधे तूप गरम करून चिरलेला कांदा, वाटलेली आले-लसून पेस्ट घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, चिकन खिमा, मीठ, घालून मिक्स करून १० मिनिट पाणी न घालता मंद विस्तवावर शिजवून घ्या. चिकन खिमा शिजल्यावर थंड करायला बाजूला ठेवा. खिमा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटलेल्या खिम्यात ब्रेड स्लाईस, फेटलेले अंडे, कोथंबीर घालून चांगले मळून घेऊन त्याचे १५ एक सारखे गोळे बनवून घ्या.
सारणासाठी: तुकडे केलेले सगळे ड्रायफ्रुट मिक्स करून त्यामध्ये बटर मिक्स करून सारण बनवून घ्या.
कबाब साठी: खीमाच्या जे गोळे बनवले आहेत त्यातून एक गोळा घेऊन हातावर थोडा थापून घ्या मग त्यामध्ये ड्रायफ्रुटचे सारण भरून गोळा बंद करा. अश्या प्रकारे सर्व कबाब बनवून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये बनवलेले कबाब छान कुरकुरीत होईपरंत तळून घ्या.
गरम गरम चिकन कबाब टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.