ठेचलेल्या तोंडल्याची भाजी: आपण नेहमी तोंडले उभी चिरून किंवा त्याच्या चकत्या करून भाजी बनवतो. तोंडली ठेचून सुद्धा भाजी बनवता येते. ह्या भाजीची चव वेगळी व छान लागते. अश्या प्रकारची भाजी बनवताना थोड्ली धुवून ठेचून घेऊन त्यला फोडणी देऊन शिजवून घ्या. लहान मुले अश्या प्रकारची भाजी नक्की आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जण
साहित्य:
५०० ग्राम लांबट कोवळी तोंडली
मीठ चवीने
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१ टे स्पून उडीदडाळ
४-५ लाल सुक्या मिरच्या
७-८ कडीपत्ता पाने
कृती : तोंडली धुऊन कोरडी पुसून घ्या. मग थोडी ठेचून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये प्रथम उडीदडाळ घालून थोडीशी परतून घेऊन मग मोहरी, जिरे, हिंग लाल सुक्या मिरच्या व कडीपत्ता घालून थोडेसे परतून ठेचलेली तोंडली घालून परतून मग चवीने मीठ घालून मिक्स करा. कढईवर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून भाजी मंद विस्तवावर १०-१२ मिनिट शिजू द्या.
ठेचलेली तोंड्लीची भाजी गरम गरम भाकरी अथवा चपाती बरोबर सर्व्ह करा.