Amba Angoori Rasmalai Recipe in Marathi

Mango or Amba Angoori Rasmalai
Amba Angoori Rasmalai

आंब्याची अंगुरी रसमलई: आपण नेहमी रसमलई बनवतो. पण हापूस आंब्याचा पल्प वापरून रसमलई बनवली तर त्याची चव फार छान लागते. ही डीश आपण पार्टीला अथवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो.

The English language version of this Rasmalai recipe and its preparation method can be seen here – Mango Angoori Rasmalai

साहित्य:
अंगुरी रसगुल्ला साठी:
१/२ लिटर गाईचे दुध
१ टे स्पून साखर
१ टी स्पून लिंबूरस
१ बाटली थंड पाणी

रसमलाईच्या दुधासाठी:
१/२ लिटर दुध (म्हशीचे)
१/२ कप हापूस आंब्याचा पल्प
२ टे स्पून साखर
१/२ टी स्पून वेलचीपूड
ड्रायफ्रुट (तुकडे सजावटी साठी)

Mango or Amba Angoori Rasmalai
Amba Angoori Rasmalai

कृती: दुधासाठी: दूध व साखर मिक्स करून गरम करून ५-७ मिनिट उकळवून घ्या. मग त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करा. दुध थंड झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा पल्प मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवा.

अंगुरी रसगुल्लासाठी: गाईचे दुध गरम करून त्यामध्ये लिंबूरस घालून मिक्स करा. मग दुध फाटले की एक मिनिट मंद विस्तवावर ठेवा, नंतर एका चाळणीवर एक कपडा ठेवून त्यावर दुध ओतून गाळून घ्या व वरतून थंड पाणी घाला. ह्याला छाना म्हणतात. पाणी पूर्ण काढून घेऊन त्यामध्ये एक चिमुट सोडा घालून एकदा मिक्सरमध्ये काढून घ्या. मग एका प्लेटमध्ये छाना काढून त्यामध्ये साखर घालून थोडा मळून घ्या व त्याचे छोटे गोळे बनवा.

एका मध्यम आकाराच्या भांड्यात २-३ ग्लास पाणी व २-३ चमचे साखर घालून गरम करून घ्या. मग त्यामध्ये बनवलेले गोळे घाला. भांड्यावर झाकण ठेवून ५-७ मिनिट उकळवून घ्या. गोळे थंड झाल्यावर त्या मधील पाणी थोडेसे दाबून काढा व थंड दुधामध्ये घालून मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवा.आंब्याची रसमलई थंड सर्व्ह करा, वरतून ड्रायफ्रुटने सजवा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.