आंब्याची मलई बर्फी: एप्रिल, व मे महिना चालू झाला की सगळ्यांना फळांचा राजा अंबा ह्याचे वेध लागतात. तेव्हा आपण आंब्याच्या रसा पासून नाना विध प्रकार बनवतो. आपण नेहमी मलई बर्फी बनवतो. तसेच आपल्याला आंब्याच्या रसापासून आंब्याची मलई बर्फी घरच्या घरी बनवता येते. ही बर्फी बनवताना दुध, मिल्क पावडर, आंब्याचा रस व साखर वापरली आहे. ही बर्फी चवीला अप्रतीम लागते.
The English language version of this Burfi recipe and its preparation method can be seen here – Mango Malai Burfi
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १२-१५ वड्या बनतात
साहित्य:
५०० मिली लिटर दुध (म्हशीचे)
१/४ कप हापूस आंब्याचा रस (घट्ट)
१ टे स्पून मिल्क पावडर
२ टे स्पून साखर
एक चिमुट तुरटी
ड्राय फ्रुट सजावटीसाठी
कृती: दुध गरम करायला ठेवा त्यामध्ये तुरटी विरघळवून घ्या. दुध गरम झाले की साखर, मिल्क पावडर, आंब्याचा रस घालून मंद विस्तवावर आटवायला ठेवा. मिश्रण पूर्ण आटले पाहिजे.
मिश्रण आटल्यावर एका स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा स्टीलच्या ट्रेमध्ये ओतून एक सारखे पसरवून घ्या. मग त्यावर ड्रायफ्रुटने सजवा.
आंब्याची मलई बर्फी थंड झाल्यावर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.