टोमाटो सरबत: आपल्या घरी नेहमी टोमाटो उपल्ब्ध असतात. त्यामुळे अश्या प्रकारचे सरबत कधीही बनवता येते. हे सरबत छान आंबटगोड लागते. असे म्हणतात की रोज टोमाटोचे सेवन केले की आपल्याला डॉक्टरची गरज भासत नाही. त्यामुळे आपल्या रक्तातील रक्त कण वाढतात., जेवणात रुची निर्माण होते, पचनशक्ती वाढते, मनात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. असेहे गुणकारी सरबत आहे.
The English language version of this Sherbet recipe and the preparation method can be seen here – Nutritious Tomato Sherbet
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ ग्लास बनतात
साहित्य:
५ मोठे लाल पिकलेले टोमाटो
४ कप थंड पाणी
१ टे स्पून लिंबूरस
साखर-मीठ चवीने
कृती:
टोमाटो स्वच्छ धुऊन पुसून घ्या. ,ह त्याचे लहान तुकडे कापून घ्या. टोमाटोचे तुकडे ब्लेंड करून घेऊन त्यामध्ये थंड पाणी, साखर, मीठ व लिंबूरस घालून परत ब्लेंड करून घ्या. फ्रीजमध्ये थंड करून मग सर्व्ह करा.