आंब्याची फिरनी: फिरनी ही पंजाब व काश्मिर मधील लोकप्रिय डीश आहे. फिरनीमध्ये आंबा पल्प घालून एक वेगळीच छान चव येते.
The English language version of this Kashmiri Phirni recipe and its preparation method can be seen here – Mango Phirni
बनवण्यासाठी वेळ: ३५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ टे स्पून आंबेमोहर तांदूळ
१/२ टे स्पून तूप
१ १/२ कप दुध
३ टे स्पून साखर
१/२ टी स्पून वेलचीपूड
१ कप हापूस आंब्याचा पल्प
कृती: तांदूळ धुऊन घ्या व न्यपकीनवर १५-२० मिनिट पसरवून ठेवा. थोडे सुकल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये वाटलेले तांदूळ घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. त्यामध्ये दुध घालून मिक्स करून ५ मिनिट मंद विस्तवावर शिजत ठेवून हलवत रहा, गुठळी होता कामा नये. मग त्यामध्ये साखर, वेलचीपूड घालून मिक्स करून २ मिनिट मंद विस्तवावर तसेच ठेवा. थंड झाल्यावर आंब्याचा पल्प मिक्स करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
The Marathi Language Video of this Delicious Mango Phirni can be seen here: North Indian Style Mango Phirni