अननस थंडाई: अननस थंडाई हे एक हेल्दी पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात हे अगदी लहान मुलांन पासून मोठ्या परंत सगळ्यांना आवडेल असे आहे. ही थंडाई बनवताना बदाम व खसखस वापरली आहे.
The English language version of this Thandai recipe and its preparation method can be seen here – Pineapple Thandai
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४-५ जणासाठी
साहित्य:
१ कप अननसाचे तुकडे
२ कप अननसाचा जूस
१५ बदाम
२ टे स्पून खसखस
२ टे स्पून साखर
कृती: प्रथम बदाम व खसखस ८-१० तास भिजत ठेवा. मग बदामाची साले काढून घ्या. सोललेले १० बदाम, खसखस ह्याची मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट करून घ्या. मग बदामाची पेस्ट व ४-५ ग्लास थंड पाणी घेऊन चांगले मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये अननसाचा जूस, साखर, घालून मिक्स करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा,
राहिलेले बदामाचे उभे पातळ काप करून घ्या. अननस थंडाई सर्व्ह करतांना बदामाचे काप, अननसाचे तुकडे व बर्फ घालून सर्व्ह करा.
nice receipe