कॉर्न आप्पे: कॉर्न आप्पे हे नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. ह्या आगोदर आपण चणाडाळ व उडीदडाळ वापरून आप्पे बनवले आता कॉर्न व पोहे वापरून झटपट आप्पे कसे बनतात ते पाहूया.
The English language version of this Appe recipe and the preparation method can be seen here – Sweet Corn Appe
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी ४ जणासाठी
साहित्य:
२ कप स्वीट कॉर्नचे दाणे
२ टे स्पून रवा
४ कप पोहे
१ टी स्पून आले
१ टी स्पून लसून
३-४ हिरव्या मिरच्या
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने
तेल आप्पे बनवण्यासाठी
कृती:
स्वीट कॉर्नचे दाणे उकडून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची वाटून घ्या. कोथंबीर बारीक चिरून घ्या.
एका बाउलमध्ये जाडसर वाटलेले कॉर्नचे दाणे, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, पोहे, रवा, लिंबूरस व मीठ घालून मिक्स करून घ्या.
आप्पे पात्राला तेल लावून विस्तवावर गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये बनवलेले एक-एक टे स्पून मिश्रण घालून कडेनी थोडे-थोडे तेल घाला व त्यावर स्टीलची प्लेटची प्लेट ठेवून ३-४ मिनिट मध्यम विस्तवावर आप्पे शिजू ध्या. मग प्लेट कडून आप्पे उलटे करून परत थोडेसे तेल सोडा व २-३ मिनिट मध्यम विस्तवावर आप्पे शिजू घ्या.
गरम गरम आप्पे टोमाटो सॉस अथवा पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करा.