आंब्याची शंकरपाळी:
आंब्याची शंकरपाळी ही चवीस्ट लागते. ह्या आगोदर आपण आंब्याची करंजी, मोदक व वेगवेगळे बरेच पदार्थ पाहिले. आता आंब्याच्या रसा पासून शंकरपाळीपण बनवता येते. तसेच बनवण्यासाठी सोपी आहे व चवपण निराळी लागते. शंकरपाळी बनवताना आंब्याचा रस काढून घेतला मग तूप व पिठीसाखर चांगली फेटून घेऊन त्यामध्ये मैदा मिक्स करून आंब्याचा रस घालून पीठ चांगले मळून घेतले व नेहमी प्रमाणे शंकरपाळी बनवली आहे.
The Marathi language video of Sweet Delicious Mango Shankarpali For Diwali Faral can be seen on our YouTube Channel: Sweet Delicious Mango Shankarpali For Diwali Faral
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३/४ किलो ग्राम बनते
साहित्य:
५०० ग्राम मैदा
१ कप पिठीसाखर
२ मोठे आंबे
१/२ कप तूप
तेल शंकरपाळी तळण्यासाठी
कृती: मैदा चाळून घेऊन बाजूला ठेवा. आंब्याचा रस मिक्सरमध्ये फेरवून घ्या. तूप थोडे पातळ करून घ्या. एका परातीत तूप व पिठीसाखर चांगली फेसून घेऊन त्यामध्ये मैदा घालून मिक्स करा. मग त्यामध्ये आंब्याचा जूस घालून पीठ चांगले मळून घेऊन ३० मिनिट बाजूला ठेवा.
मळलेल्या पीठाचे एक सारखे ४ गोळे करा. एक गोळा घेऊन लाटून शंकरपाळी च्या आकाराचा करून घ्या. अश्या प्रकारे सर्व गोळे लाटून घेऊन बाजूला ठेवा.
एका कढईमधे तेल किंवा तूप गरम करून घेऊन शंकरपाळी छान कुरकुरीत तळून घेऊन थंड करायला ठेवा.
शंकरपाळी थंड झाली की घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
टीप: आंब्याच्या रसात मैदा घातल्यावर पीठ मळताना जर कोरडे झालेतर थोडे दुध वापरून पीठ मळून घ्या.