खजुराच्या साटोऱ्या: साटोऱ्या ही एक स्वीट डीश आहे. ही डीश आपण सणावाराला बनवू शकतो. खजूर हा पौस्टिक आहे त्याच्या साटोऱ्या ह्या चवीला छान लागतात. खजुराच्या साटोऱ्या बनवायला सोप्या व घरात सर्वाना आवडतील अश्या आहेत. खजुराचे सारण बनवताना प्रथम खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये बारीक केला आहे. खसखस व सुके खोबरे भाजून थोडे जाडसर कुटून घेतले आहे. वाटलेला खजूर, खसखस, सुके खोबरे, वेलचीपूड, पिठीसाखर, जायफळ पूड घालून सारण बनवले आहे. पुरीमध्ये हे सारण भरून घेऊन पुरी तळून घेतली आहे.
The English language version of the same Khajur Satori can be seen here – Dates Satori for Diwali Faral
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २० बनतात
साहित्य:
आवरणासाठी:
१ १/२ कप मैदा
१ १/२ कप गव्हाचे पीठ
३ टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
तूप साटोरी तळण्यासाठी
सारणासाठी:
१ कप खजूर (बिया काढून)
१ कप बेसन
१ कप पिठीसाखर
२ टे स्पून खसखस
१/२ कप सुके खोबरे (किसून)
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून जायफळ
२ टे स्पून मिल्क पावडर
कृती:
आवरणासाठी: मैदा, गव्हाचे पीठ, गरम तेल, मीठ घालून मिक्स करून थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या.
सारणासाठी: खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. सुके खोबरे किसून घ्या. तवा गरम करून सुके खोबरे व खसखस भाजून जाडसर वाटून घ्या. बेसन व दोन चमचे तूप घालून खमंग भाजून घ्या.
मग वाटलेला खजूर, पिठीसाखर, भाजलेले बेसन, खसखस, सुके खोबरे, वेलचीपूड, जायफळ, मिल्क पावडर मिक्स करून सारण बनवून घ्या.
साटोरी साठी: भिजवलेल्या पीठाचे एक सारखे २० गोळ बनवा. एक एक गोळा घेऊन पुरी सारखा लाटून घेऊन त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून पुरी बंद करून घेऊन थोडी लाटून घ्या. अश्या प्रकारे सर्व पुऱ्या बनवून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून घेऊन सर्व पुऱ्या तळून घ्या.