हरियाली पनीर टिक्का: हरियाली पनीर टिक्का ही एक स्टारटर डीश आहे. ही डीश बनवतांना पनीर, शिमला मिर्च, कांदा, मोठे टोमाटो, काकडी वापरली आहे, तसेच हे सर्वप्रथम मसाल्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवून ओव्हनमध्ये ग्रील केले आहे. ही एक पौस्टिक डीश आहे कारण ह्यामध्ये भाज्या व पनीर वापरले आहे व तेलाचा जास्त वापर केलेला नाही.
The Marathi language version of the same Paneer Tikka recipe and its preparation method can be seen here – Crispy Paneer Tikka
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
४०० ग्राम पनीर
१ मोठी शिमला मिर्च
१ मोठा कांदा
१ मोठा टोमाटो
१ मध्यम आकाराची काकडी
२ टे स्पून तेल
मँरीनेशन साठी:
१ कप दही (घट्ट)
१ टे स्पून पुदिना पाने (जाडसर वाटून)
१ टे स्पून कोथंबीर (जाडसर वाटून)
४ हिरव्या मिरच्या
१ टे स्पून लिंबूरस
२ टीस्पून लसून (पेस्ट)
१/२ टी स्पून गरम मसाला
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून चाट मसाला
मीठ चवीने
१ टे स्पून बटर
कृती:
भाज्या धुऊन त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. पनीरचे तुकडे करून घ्या.
एका काचेच्या मोठ्या बाउलमध्ये भाज्याचे तुकडे, पनीर व मँरीनेशनचे सर्व साहित्य घालून मिक्स करून घ्या. मिक्स केल्यावर बाउल फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा. मग नॉनस्टिक प्लेटमध्ये सर्व भाज्या ठेऊन वरतून थोडे तेल ब्रशने लावा.
मायक्रोवेव्ह आधी गरम करून घ्या. मायक्रोवेव्ह प्रीहिट झाल्यावर नॉनस्टिक प्लेट ओव्हनमध्ये ठेवा. मग १५-१८ मिनिट ग्रीलवर सेट करून सर्व भाज्या ग्रील वर भाजून घ्या. मधून मधून तेलाचा हात लावा.
हरियाली पनीर टिक्का गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून चाट मसाला घालून सर्व्ह करा.