आंबा-नारळाची वडी-बर्फी: आंब्याचा सीझन चालू झाला की आंब्याच्या रसापासून नानाविध पदार्थ बनवता येतात. आंब्याचा वड्या बनवायला सोप्या आहेत व चवीस्टपण लागतात. आंब्याचा सीझन नसेल तर टीन मधील आंबा सुद्धा वापरू शकता. ह्या वड्या बनवताना हापूस आंबा वापरला आहे. आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो.
The English language version of the same Burfi recipe can be seen here – Delicious Mango-Coconut Vadi
आंबा नारळ वडी बनवण्यासाठी वेळ : ४५ मिनिट
वाढणी: २५ वड्या बनतात
साहित्य:
२ कप नारळ (खोऊन)
१ कप हापूस आंब्याचा पल्प
१/२ कप साखर
१ कप दुध
१ टी स्पून वेलचीपूड
१ टी स्पून तूप
ड्रायफ्रुट सजावटीसाठी
कृती:
एका जाड बुडाच्या कढईमधे खोवलेला नारळ, आंब्याचा रस, साखर व दुध मिक्स करून घ्या. मग मंद विस्तवावर मिश्रण मंद विस्तवावर घट्ट होई परंत ठेवा. मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करून घ्या.
एका प्लेटला तुपाचा हात लाऊन त्यावर मिश्रण एक सारखे थापून घेऊन त्यावर ड्रायफ्रुटच्या तुकड्यांनी सजवून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या.