Farasbi Salad Recipe in Marathi

French Beans
Farasbi

फ्रेंच बीन्स सलाड: फ्रेंच बीन्स सलाड म्हणजेच फरसबी किंवा श्रावण घेवडाचे सलाड होय. आपण नेहमी टोमाटो, काकडी, कोबी, बीटरूटचे सलाड बनवतो. हे सलाड बनवून बघा चवीला खूप छान लागते. हे सलाड बनवताना बीन्स चिरून थोड्या शिजवून घातल्या व त्यामध्ये शेंगदाणे कुट, लिंबूरस, साखर घालून वरतून फोडणी घातली आहे.

The English language version of the same recipe can be seen here – French Beans Salad

बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
२ कप फ्रेंच बीन्स/ श्रावण घेवडा (चिरून)
३ टे स्पून शेगदाणे कुट
१ टी स्पून लिंबूरस
२ टे स्पून नारळ (खोवलेला)
१ टी स्पून साखर
१/४ कप कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने

फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
२ हिरव्या मिरच्या (चिरून)

French Beans
Farasbi

कृती:
प्रथम बीन्स धुऊन चिरून घ्या व २ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. शेगदाणे भाजून, सोलून कुट करून घ्या. नारळ खोऊन घ्या. कोथंबीर धुऊन चिरून घ्या.
एका भांड्यात शिजवलेली बीन्स, शेगदाणे कुट, कोथंबीर, मीठ, लिंबूरस, साखर घालून मिक्स करून घ्या.
एका छोट्या कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद, हिरवी मिरची घालून मिक्स करून फोडणी बीन्स वर घालून एक सारखे करून घ्या.
सर्व्ह करतांना नारळाने सजवून मग सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.