टोमाटो-बीटरूट सूप: टोमाटो बीटरूट सूप हे चवीला खूप छान लागते. तसेच दिसायला सुद्धा रंगीत छान दिसते. टोमाटो बीटरूट सूप हे पौस्टिक आहे. बीटरूट हे गुणकारी आहे व पचण्यास थोडेसे जड आहे. बीट हे रक्तवर्धक, शक्तिदायक व पौस्टिक आहे. बीटरूटच्या सेवनाने शरीरातील फिकटपणा दूर होतो. शरीर लाल बुंद होते. बीटरूट मध्ये जीवनसत्व “ए” , “बी” व “सी” तसेच लोह, स्टार्च आहे.
टोमाटो हा गुणकारी आहे. टोमाटोमध्ये रक्त निर्माण करण्याची शक्ती जास्त आहे. टोमाटो मध्ये जीवनसत्व “ए” , “बी” व “सी” पुष्कळ प्रमाणात आहे.
The English language version of the same soup preparation method can be seen here – Nourishing Tomato-Beetroot Soup
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
४ मोठ्या आकाराचे टोमाटो
१ मोठे बीटरूट
१ मध्यम आकाराचा कांदा
६-७ लसूण पाकळ्या (चिरून)
८-१० काळी मिरी
१” दालचीनी तुकडा
३ लवंग
२ हिरवे वेलदोडे
२ टे स्पून बटर
मीठ चवीने
कृती: टोमाटो व बीटरूट धुऊन चिरून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या. कांदा चिरून घ्या.
प्रेशर कुकरमध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, लसून, मिरे, दालचीनी, लवंग, वेलदोडा घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेले टोमाटो, बीटरूट, मीठ, दोन कप पाणी घालून मिक्स करून दोन शिट्या काढा. कुकर थंड झाल्यावर आतील मिश्रण एका बाऊलमध्ये काढून थंड करायला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
नॉन स्टिक भांड्यात टोमाटो-बीटरूटचे वाटलेले मिश्रण ओतून त्यामध्ये एक कप पाणी घालून चांगली उकळी आणा. सर्व्ह करतांना वरतून मिरे पूड व क्रीम घालून सर्व्ह करा.