काकडीची खीर: काकडीची खीर ही थंड गार छान लागते. आपण वेगवेगळ्या खीर सणावाराला बनवतो. काकडीची खीर बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. काकडीची खीर बनवताना खोया, दुध व साखर वापरली आहे. ही खीर थंड छान लागते.
The English language version of the same Kheer recipe can be seen here – Cucumber Kheer-Pudding
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ मध्यम आकाराच्या काकड्या
१/२ लिटर दुध
१/२ कप साखर
१ टी स्पून वेलचीपूड
२ टे स्पून खवा
१ टे स्पून गुलकंद
कृती:
काकडी धुऊन सोलून किसून घ्या.
दुध गरम करायला ठेवा व ५-७ मिनिट उकळत ठेवा. दुध उकळले की त्यामध्ये किसलेली काकडी घालून
२-३ मिनिट उकळून घ्या. मग त्यामध्ये साखर, खवा, गुलकंद व वेलचीपूड घालून मिक्स करून एक मिनिट उकळून घेऊन थंड करायला ठेवा. नंतर काकडीची खीर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
काकडीची खीर थंड सर्व्ह करा. सर्व्ह करतांना ड्रायफ्रुटने सजवा.