तळलेले राईस बॉल्स: राईस बॉल्स ही एक नाश्त्याला बनवायला छान डीश आहे. राईस बॉल्स बनवण्यासाठी ताजा किंवा शिळा भात असेल तरी चालेल. हे बॉल्स झटपट बनतात व बनवायला अगदी सोपे आहेत. राईस बॉल्स बनवतांना त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची, ब्रेड क्रम, कोथंबीर, ओला नारळ, मीठ घालून मळून त्याचे बॉल बनवून तळून घेतले आहे. लहान मुलांना अश्या प्रकारचे राईस बॉल नक्की आवडतील.
The English language version of the same recipe can be seen here – Crispy Deep-Fried Rice Balls
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ८-१० बॉल बनतात
साहित्य:
२ कप भात (शिजलेला)
१/२ कप नारळ (खोऊन)
१ टे स्पून आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट
१/२ कप कोथंबीर (चिरून)
२ ब्रेड स्लाईस (क्रम)
१ टी स्पून जिरे (पावडर)
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कृती:
एका बाउलमध्ये शिजवलेला भात, ओला नारळ, आले-लसून-हिरवी मिरची, कोथंबीर, ब्रेड क्रम, जिरे पावडर, मीठ, घालून चांगले मळून घ्या. मळलेल्या पीठाचे एक सारखे ८-१० गोळे बनवून घ्या.
एका कढईमधे तेल गर करून बनवलेला गोळे छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम राईस बॉल टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.