वेजिटेबल नुडल्स सूप: वेजिटेबल नुडल्स सूप हे लहान मुलांना व मोठ्याना सुद्धा आवडेल. ह्यामध्ये भाज्यांचा स्टॉक व भाज्या सुद्धा आहेत त्यामुळे ते पौस्टिक सुद्धा आहे. नुडल्स तर सर्वाना आवडतात तसेच ह्या सुपा मुळे पोट सुद्धा चांगले भरते.
The English language version of this Soup recipe can be seen here – Vegetable Noodles Soup
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१०० ग्राम नुडल्स
१ कप कोबी (पातळ उभा चिरून)
१/२ कप गाजर (किसून)
१ कप कांदा पात (चिरून)
१ टे स्पून तेल/बटर
१ टी स्पून आले
१ टी स्पून सोया सॉस
१ टी स्पून साखर
४ कप व्हेजीटेबल स्टॉक
मीठ चवीने
मिरे पावडर चवीने
कृती: एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये नुडल्स घालून थोड्याश्या परतून घेऊन त्यामध्ये ४-५ कप पाणी घालून नुडल्स शिजवून चाळणीवर ओतून थंड करायला ठेवा.
व्हेजीटेबल स्टॉक करण्याकरीता: दोन कप व्हेजीटेबल (गाजर, बीन्स, टोमाटो, कोबी, फ्लॉवर, दुधीभोपळा) व ५ कप पाणी घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर शिजत ठेवा. नंतर भाज्यांचे पाणी गाळून घ्या. ह्यालाच स्टॉक म्हणतात.
कढईमधे राहिलेले तेल घालून शिजवलेल्या नुडल्स, सोया सॉस, साखर, मीठ, मिरे पावडर घालून २ मिनिट चांगली उकळी आणा.
गरम गरम वेजिटेबल नुडल्स सूप सर्व्ह करा.