आंब्याची साटोरी: आंब्याची साटोरी ही हापूस आंब्याच्या रसा पासून बनवली आहे. ह्या साटोऱ्या चवीला चान लागतात. आपण साटोरी बनवतांना खवा सारण म्हणून वापरतो. पण ह्या साटोऱ्या बनवतांना खवा वापरण्या आयवजी बेसन चांगले भाजून वापरले आहे व त्यामध्ये आंब्याची प्युरी वापरली आहे.
The English language version of the same Satori recipe can be seen here – Delicious Mango Satori
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १२ बनतात
साहित्य:
सारणासाठी:
१ कप बेसन
२ कप आंब्याचा
३/४ कप साखर
१ टी स्पून वेलचीपूड
आवरणासाठी:
१ कप मैदा
१ टे स्पून तूप (गरम)
मीठ चवीने
तूप आंब्याची साटोरी तळण्यासाठी
कृती: आवरणासाठी: मैदा, गरम तूप, मीठ व थोडेसे पाणी घालून घट्ट पीठ मळून घेऊन ३० मिनिट बाजूला ठेवा. मग मळलेल्या पीठाचे एक सारखे १२ गोळे तयार करा.
सारणासाठी: कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये बेसन मिक्स करून मंद विस्तवावर ५-७ मिनिट खमंग भाजून घ्या. मग त्यामध्ये आंब्याचा पल्प व साखर घालून मिक्स करून मिश्रण घट्ट होईपरंत आटवून घेऊन त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करून थंड करायला ठेवा.
आंब्याची साटोरी: एक पिठाचा गोळा घेऊन पुरी सारखा लाटून घेऊन त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून पुरी बंद करून हलक्या हातानी लाटून घ्या. अश्या प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घ्या.
कढईमधे तूप गरम करून आंब्याच्या साटोऱ्या गुलाबी रंगावर छान कुरकुरीत तळून घ्या.
आंब्याच्या पुऱ्या थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.