झटपट जिलेबी: जिलेबी ही सर्वाना आवडते. जिलेबी इतर वेळी किंवा सणावाराला सुद्धा बनवता येते. जिलबी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. जिलेबी आपण घरी घरी सुद्धा बनवु शकतो. जिलेबी बनवतांना मैदा, कॉर्नफ्लोर व एक टे स्पून दही वापरले आहे. पाक बनवतांना साखर, ऑरेज जूस अथवा लिंबूरस वापरला आहे. लिंबूरस वापरल्या मुळे जिलबीला छान चकाकी येते.
The English language version of the same Jalebi recipe can be seen here – Quick Homemade Jalebi
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २०-२५ बनतात
साहित्य:
१ कप मैदा
१ टे स्पून कॉर्नफ्लोर
मीठ चवीने अथवा एक चिमुट
१ टे स्पून दही
३/४ कप पाणी (कोमट)
एक चिमुट सोडा बाय कार्ब
वनस्पती तूप जिलेबी तळण्यासाठी
साखरेचा पाक बनवण्यासाठी:
१ कप साखर
१ कप पाणी
२ टे स्पून ऑरेज जूस अथवा १ टी स्पून लिंबूरस
१/८ टी स्पून ऑरेज कलर
कृती:
मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ, दही, कोमट पाणी, मिक्स करून १५ मिनिट बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या भांड्यात साखर, पाणी एकत्र करून १० मिनिट मंद विस्तवावर ठेवा. मग त्यामध्ये ऑरेज जूस किंवा लिंबूरस घालून मिक्स करून विस्तव बंद करून भांडे तसेच ठेवा म्हणजे साखरेचा पाक गरम राहील.
एका कढईमधे तूप गरम करायला ठेवा.
एक टी स्पून पाण्यात सोडा-बाय-कार्ब विरघळून घेऊन मैदाच्या मिश्रणात मिक्स करा.
जाड प्लास्टिकची पिशवी (दुधाची पिशवी) घेऊन एक कोपऱ्यात थोडीशी कापून घ्या. दोन डाव मैद्याचे मिश्रण त्यामध्ये घालून हातानी पिशवी थोडी-थोडी दाबून गरम तुपामध्ये जिलेबी सोडा. जिलेबी छान पिवळ्या रंगावर तळून घ्या. तळलेली जिलेबी पाकामध्ये २-३ मिनिट ठेवून मग चाळणीवर निथळत ठेवा.
गरम गरम जिलेबी सर्व्ह करा.