काजूची कचोरी: काजूची कचोरी ही नाश्त्याला किंवा साईड डीश म्हणून बनवता येते. काजूची कचोरी बनवताना काजू, आले-लसूण, सुके खोबरे, बडीशेप, कोथंबीर वापरली आहे. तसेच आवरणासाठी मैदा वापरला आहे. काजूची कचोरी ही चवीला वेगळी लागते. बनवायला सोपी व लवकर होणारी आहे.
The English language version of the same Kachori recipe can be seen here – Kaju Ki Kachori
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २० बनतात
साहित्य:
सारणासाठी:
१/२ कप कोथंबीर (चिरून)
४ लसूण पाकळ्या
६ हिरव्या मिरच्या
२ टे स्पून सुके खोबरे (किसून)
१ कप काजू
१ कप कांदा (उभा पातळ चिरून तळून घ्या)
१/२ टी स्पून धने-जिरे पावडर
१/४ टी स्पून गरम मसाला
१/४ टी स्पून बडीशेप
१ टी स्पून साखर
मीठ चवीने
आवरणासाठी:
२ कप मैदा
२ टे स्पून वनस्पती तूप
२ टे स्पून कॉर्नफ्लोर
मीठ चवीने
तेल कचोरी तळण्यासाठी
कृती:
सारणासाठी: काजू पाण्यात एक तास भिजत ठेवा. मग पाण्यातून काढून पुसून कोरडे करून बारीक चिरून घ्या.
कोथबीर, आले-लसून, हिरवी मिरची, सुके खोबरे (भाजून) मिक्सरमध्ये वाटून घ्या.
कढईमधे एक टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये काजू, धने-जिरे पावडर, गरम मसाला, बडीशेप, तळलेला कांदा (कुस्करून), साखर, मीठ घालून सारण तयार करून घ्या.
आवरणासाठी: मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ व वनस्पती तूप (गरम करून) मिक्स करून घेऊन थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. मळलेले पीठ १० मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे एक सारखे २० गोळे बनवून घ्या.
एक गोळ घेऊन छोट्या पुरी सारखा लाटून त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून पुरी बंद करून थोडी लाटून घ्या. अश्या प्रकारे सर्व कचोरी बनवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून कचोऱ्या छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम कचोरी टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.