कांदा-पुदिना पराठा: कांदा पुदिना पराठा हा नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात द्यायला चांगला पौस्टिक आहे. कमी वेळात झटपट होणारा आहे. कांदा पुदिना पराठ्याला नान सुद्धा म्हणता येईल. पुदिना वापरल्यामुळे पराठा चवीला छान लागतो. पुदिना हा औषधी आहे. पुदिन्याच्या सेवनाने कफ मोकळा होतो, पचनशक्ती सुधारते, पिक्तकारक आहे, चांगली भूक लागते.
The English language version of this Paratha recipe can be seen here – Naan with Pudina and Kanda Toppings
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ पराठे/नान
साहित्य: नान साठी:
१ कप गव्हाचे पीठ
१/२ कप मैदा
१ टी स्पून साखर
१ टे स्पून दही
एक चिमुट सोडा -बाय-कार्ब
मीठ चवीने
१/२ टे स्पून तेल
वरील आवरणासाठी:
१ मोठा कांदा (बारीक चिरून)
१/२ कप पुदिना पाने (चिरून)
तेल किंवा तूप नान भाजण्यासाठी
बटर वरतून लावण्यासाठी
कृती: कांदा व पुदिना बारीक चिरून घ्या.
गव्हाचे पीठ, मैदा, मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये सोडा बाय कार्ब व दही घालून मिक्स करून घ्या. पाणी व थोडे दुध घालून घट्ट पीठ मळून घेऊन अर्धा तास झाकून बाजूला ठेवा. मग मळलेल्या पीठाचे एक सारखे चार गोळे बनवा.
एक पिठाचा गोळा घेऊन पुरी सारखा लाटून मध्य परंत एक चीर देऊन मुडपून घ्या. मग गोल लाटून घ्या. पराठा लाटून झाल्यावर वरतून चिरलेला कांदा व पुदिना पसरवून परत हलक्या हातानी लाटून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून घेऊन कांदा-पुदिना पराठा तव्यावर तूप अथवा तेल घालून चांगला खमंग भाजून घ्या.
कांदा-पुदिना पराठा सर्व्ह करताना वरतून बटर घालून सर्व्ह करा.