पत्ता गोबी-कोबी चा पराठा: पत्ता कोबी मध्ये प्रोटीन, कँल्शीयम, लोह विपुल प्रमाणात आहे. तसेच जीवनसत्व “ ए , “बी” व “सी” आहे. ह्याचा पराठा पौस्टीक व टेस्टी लागतो.
The English language version of this Paratha rccipe can be seen here- Cabbage Paratha
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ५-६ पराठे
साहित्य:
आवरणासाठी: ४ कप गव्हाचे पीठ
मीठ चवीने
२ टे स्पून तेल
सारणासाठी:
३ कप कोबी (किसून)
४ हिरव्या मिरच्या (चिरून
१ टी स्पून आले पेस्ट
१ टी स्पून गरम मसाला,
दोन चिमुट मिरे पावडर
१ कप कोथंबीर (चिरून) १ टी स्पून लिंबूरस
१/२ कप पुदिना पाने (चिरून)
१/२ कप तेल
मीठ चवीने
कृती: आवरणासाठी: गव्हाचे पीठ, मीठ, तेल व पाणी वापरून पीठ मळून १५-२० मिनिट बाजूला ठेवा.
सारणासाठी: कोबी धुऊन किसून चाळणीवर निथळत ठेवा. मग किसलेला कोबी, हिरवी मिरची, आले पेस्ट, गरम मसाला, मिरे पावडर, चिरलेली कोथंबीर, लिंबूरस, पुदिना पाने, मीठ घालून एक सारखे मिक्स करून घ्या.
पराठा बनवण्यासाठी: मळलेल्या पीठाचे एक सारखे १०-१२ गोळे बनवून घ्या. दोन गोळे घेऊन पुरी सारखे वेगवेगळे लाटून घ्या. एक पुरीवर २ टे स्पून बनवलेले सारण पसरवून त्यावर लाटलेली दुसरी पुरी ठेवून त्याच्या कडा दाबून घ्या व पराठा लाटून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर पराठा तेल लाऊन खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून भाजून घ्या.
गरम गरम पराठे टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.