पनीर Sandwich: आपण नेहमी वेगवेगळ्याप्रकारे sandwich बनवतो. पनीर Sandwich हा एक छान प्रकार आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात किंवा घरी दुधाबरोबर द्यायला किंवा नाश्त्याला बनवायला छान आहे. हे Sandwich बनवतांना पनीर, दही, क्रीम, मोहरीची पावडर, मिरे पावडर वापरली आहे व सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे. त्यामुळे ह्याची चव निराळी व छान लागते.
The English language version of the same Sandwich can be seen here – Healthy and Delicious Paneer Sandwich
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४-५ बनतात
साहित्य:
१ कप पनीर (किसून)
१ टे स्पून दही
१ टे स्पून फ्रेश क्रीम
१ टे स्पून मोहरीच्या डाळीची पूड
१ हिरवी मिरची (चिरून)
१ टी स्पून मिरे पावडर
मीठ व साखर चवीने
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ मध्यम आकाराचा टोमाटो (चिरून)
१ मध्यम आकाराची काकडी (चिरून)
१/४ कप डाळींबाचे दाणे
१०-१२ बेदाणे (भिजवून)
३ टे स्पून चीज (किसून)
१ टे स्पून कोथंबीर (चिरून)
८-१० ब्रेड स्लाईस
१/४ कप बटर
कृती: टोमाटो काकडी धुऊन चिरून घ्या. कांदा व कोथंबीर चिरून घ्या. चीज किसून घ्या. पनीर किसून घ्या.
किसलेले पनीर, दही, फ्रेश क्रीम, मोहरी पूड, मिरे पावडर, मीठ व साखर चवीने, किसलेले चीज घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
चिरलेली काकडी, टोमाटो, कांदा, डाळिंब दाणे, कोथं बीर, मिक्स करून घ्या.
ब्रेडची स्लाईस घेऊन त्याला एका बाजूनी बटर लावून त्यावर एक टे स्पून पनीरचे मिश्रण लावून कांदा, टोमाटो, काकडी घालून त्यावर दुसरी ब्रेडची स्लाईस ठेवून मध्ये कापून घ्या. अश्या प्रकारे सर्व ह्याच कृतीने sandwich बनवून घ्या.
चहा किंवा कॉफी बरोबर सर्व्ह करा.