कारल्याची खमंग ग्रेवी: कारली ही कडू असलीतरी हितावह तसेच आरोग्य दायक आहेत. कारली ही यकृत, त्वचारोगत हितावह आहे. मधुमेह असणाऱ्यांना कारली ही हितावह आहेत. कार्ल्यामध्ये जीवनसत्व “ए” व्हीटामीन “सी” लोह, आहे. कार्ल्याच्या भाजीनी जीवन रुचकर लागते.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम ताजी कारली
१/२” चिंचेचे तुकडे (१०-१२)
गुळ चवीने
मीठ चवीने
मसाल्याकरीता:
१ कप ओला नारळ (खोऊन)
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१/२ टी स्पून हळद
४-५ लसूण पाकळ्या
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
१/४ कप शेगदाणे (भाजून)
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
कृती: कारली स्वच्छ धुऊन त्याचे ४ तुकडे करून मध्ये अर्धवट चीर द्या. प्रत्येक कार्ल्याच्या चीर दिलेल्या भागामध्ये चिंचेचा एक-एक तुकडा ठेवा. कुकर गरम करायला ठेवा. एका भाड्यात कारल्याचे तुकडे ठेवून भांडे कुकरमध्ये ठेवून, कुकरचे झाकण लाऊन दोन शिट्या द्या.
मसाल्या करीता ओलानारळ, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, गरम मसाला, हळद, लसूण, भाजलेले शेगदाणे, शेगदाणे घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून वाटलेला मसाला चांगला भाजून घ्या. मग त्यामध्ये १ कप पाणी व शिजवलेली कारली घालून मंद विस्तवावर ५-७ मिनिट शिजू द्या. मग त्यामध्ये चवीने गुळ व मीठ घालून मिक्स करून २-३ मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या.
गरम गरम कारल्याची भाजी चपाती, पराठा अथवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.