कोकणी स्टाईल चिकन ग्रेव्ही: कोकण हे महाराष्ट्रात आहे. कोकणी पदार्थ हे फार चवीस्ट लागतात. कोकणी पद्ध्तीने बनवलेले कोंबडीचे चिकन छान खमंग लागते. हे चिकन बनवण्यासाठी ताजा हिरवा मसाला व ताजा लाल मसाला वापरला आहे. कोकणी पद्ध्तीने बनवलेले चिकन हे पारंपारिक पद्धतीने बनवले आहे.
The English language version of the same Chicken Gravy can be seen here – Konkani Chicken Gravy
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
५०० ग्राम चिकन (पिसेस)
१ टे स्पून तेल
१ मध्यम कांदा (चिरून)
१ मध्यम टोमाटो (चिरून)
१/२ टी स्पून हळद
मीठ चवीने
हिरवा मसाला:
१/२ कप कोथंबीर (चिरून)
८-१० लसूण पाकळ्या
१” आले तुकडा
२ हिरव्या मिरच्या
लाल मसाला:
१ टे स्पून तेल
२ टे स्पून कांदा (चिरून)
१ कप नारळ (खोवून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
४ लवंग
७-८ मिरे
१” दालचीनी तुकडा
१ मसाला वेलदोडा
३ हिरवे वेलदोडे
१ टी स्पून जिरे
१ टी स्पून शहाजिरे
१ टी स्पून धने
कृती: चिकन साफ करून धुऊन घ्या. नारळ खोऊन घ्या. कांदा, टोमाटो व कोथंबीर चिरून घ्या.
हिरवा मसाला: कोथंबीर, आले-लसूण-हिरवी मिरची बारीक वाटून घ्या.
लाल मसाला: कढईमधे तेल गरम करून एक मिनिट कांदा परतून घ्या. मग त्यामध्ये खोवलेला नारळ घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून त्यामध्ये लाल मिरची पावडर, लवंग, मिरे, दालचीनी, मसाला वेलदोडा, हिरवा वेलदोडा, जिरे, शहाजिरे, धने घालून २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग मिक्सरमध्ये थोडे पाणी वापरून बारीक वाटून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून कांदा, टोमाटो २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये चिकनचे पिसेस, हळद, घालून ३-४ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला हिरवा मसाला घालून ५ मिनिट परतून घेऊन २ कप पाणी, मीठ व वाटलेला लाल मसाला घालून, मिक्स करून, कढईवर झाकण ठेवून, १५-२० मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
गरम गरम चिकन ग्रेव्ही तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.