न्यूट्रीशियस मिक्सिड वेजिटेबल पराठा: न्यूट्रीशियस मिक्सड वेजिटेबल पराठा म्हणजे हा पराठा बनवतांना कोबी, फ्लॉवर, गाजर, कोथंबीर व गव्हाचे पीठ वापरून बनवला आहे. मुलांना नाश्त्याला किंवा शाळेत जातांना डब्यात द्यायला चांगला आहे. मुले भाज्या खायचा कंटाळा करतात त्यामुळे असा पराठा बनवला तर पोट सुद्धा भरते व भाज्या सुद्धा खाल्या जातात.
The Marathi language version of this Paratha recipe can be seen here – Mixed Sabji Paratha
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ६-८ पराठे
साहित्य:
२ कप गव्हाचे पीठ
१ टे स्पून बेसन
१/४ कप कोबी (किसून)
१/४ कप फ्लॉवर (किसून)
१/४ कप गाजर (किसून)
१/४ कप कोथंबीर (किसून)
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून जिरे (कुटून)
१ टे स्पून तेल (गरम करून)
मीठ चवीने
तेल किवा तूप पराठे भाजण्यासाठी
कृती:
कोबी, फ्लॉवर, गाजर, धुऊन किसून घ्या. कोथंबीर धुऊन चिरून घ्या. एका मोठ्या बाउलमध्ये किसलेल्या भाज्या, चिरलेली कोथंबीर, हळद, लाल मिरची पावडर, हिंग, कुटलेले जिरे, गरम तेल व थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. मग मळलेल्या पीठाचे एक सारखे ६-८ गोळे बनवून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवून एक गोळा घेऊन पराठ्या प्रमाणे लाटून घेऊन तेल अथवा तूप वापरून छान खरपूस भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून भाजून घ्या.
गरम गरम न्यूट्रीशियस पराठे टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.