पाकातल्या शंकरपाळ्या: पूर्वीच्या काळी दिवाळी म्हंटल की सगळा फराळ करायचे. पण आता आपण वर्षभर काहीना काही पदार्थ बनवत असतो. आपण नेहमी ज्या शंकरपाळ्या बनवतो त्या साखर, दुध व मैदा मिक्स करून बनवतो. पण ह्यामध्ये आधी साध्या शंकरपाळ्या बनवून मग पाकामध्ये घोळून घ्यायच्या आहेत त्यामुळे ह्या शंकरपाळ्याची चव वेगळीच लागते व पाकात घोळल्यावर शंकरपाळी वर साखरेचा छान पांढरा थर येतो व शंकरपाळ्या छान खुटखुटीत होतात. मुलांना अश्या शंकरपाळ्या खूप आवडतात.
The English language version of the same Shankarpali recipe can be seen here – Sugar Syrup Dipped Skankarpali
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४-५ जणासाठी
साहित्य:
शंकरपाळी करीता:
२ कप मैदा
१/४ कप डालडा (गरम)
१/२ टी स्पून बेकीग पावडर
मीठ चवीने
२ कप तूप शंकरपाळी तळण्यासाठी
पाकासाठी:
१ कप साखर
२ टे स्पून पाणी
कृती: शंकरपाळी करीता: मैदा, बेकीग पावडर, मीठ व गरम तूप मिक्स करून घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घेऊन १ तास बाजूला ठेवा.
पाकासाठी : साखर व पाणी मिक्स करून मंद विस्तवावर थोडा घट्टसर थोडा चिकट पाक बनवून घ्या.
मळलेल्या पीठाचे ३ एक सारखे गोळे बनवून घ्या. एक गोळा थोडा जाडसर लाटून घेऊन त्याच्या १” लांबीच्या पट्या कापून घ्या. अश्या प्रकारे दोनी गोळे लाटून घेऊन कापून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून घेऊन शंकरपाळ्या तळून घ्या. शंकरपाळी तळताना मंद विस्तवावर तळून घ्या. शंकरपाळीचा रंग जास्त गुलाबी होता कामा नये. सर्व शंकरपाळ्या तळून झाल्यावर पाकामध्ये घोळून घेऊन १-२ तास तशाच झाकून ठेवा सुकल्यावर शंकरपाळीवर साखरेच्या पाकाचा थर येईल मग घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.