बटाटा-पोहे कटलेट: बटाटा-पोहे कटलेट हे नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात सूप बरोबर ब्रेड sandwich बनवून द्यायला छान आहे. हे कटलेट बनवतांना उकडलेले बटाटे, पोहे भिजवून त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, बेसन, मीठ, गरम मसाला घालून बनवले आहेत. अश्या प्रकारचे कटलेट ब्रेड sandwich बनवून द्यायला चांगले आहेत.
The English language version of the same Cutlet recipe can be seen here – Rice Flakes-Potato Cutlets
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १५
साहित्य:
४ मोठे बटाटे
२ कप जाडे पोहे
१/४ कप बेसन
४ हिरव्या मिरच्या
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
मीठ चवीने
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून लाल मिरच्या पावडर
एक चिमुट खायचा सोडा
२ ब्रेड स्लाईस
तेल कटलेट तळण्यासाठी
कृती: बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. पोहे ५-७ मिनिट भिजवून घ्या. मग उकडलेले बटाटे, पोहे, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, बेसन, मीठ, गरम मसाला, लाल मिरची पावडर, खायचा सोडा मिक्स करून चांगले मळून घ्या. मग त्याचे १५ एक सारखे गोळे बनवून घ्या व ब्रेड क्रम मध्ये घोळून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून बनवलेले गोळे शालो फ्राय करा.