बीटरूटची चकली: बीटरूटची चकली ही दिसायला आकर्षक दिसते व चवीलापण छान लागते. दिवाळी फाराळामध्ये अश्या प्रकारचे चकली छान दिसेल. हे चकली बनवण्यासाठी प्रथम बीटरूट उकडून घेतले आहे. व त्यामध्ये तांदळाचे पीठ व बेसन वापरले आहे. दिवाळी फराळासाठी एक रंगेबेरंगी चकली.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २५ बनतात
साहित्य:
१ कप बीटरूटची पेस्ट
२ कप तांदळाचे पीठ
१/२ कप बेसन
२ टे स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून बटर,
१ टी स्पून जिरे पावडर
१ टे स्पून तीळ
१/२ टी स्पून हिंग
मीठ चवीने
तेल चकली तळण्यासाठी
कृती: बीटरूट उकडून, सोलून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. एका परातीत तांदळाचे पीठ, बेसन, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, हिंग, मीठ व बटर घालून मिक्स करून घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून नेहमी चकलीसाठी जसे पीठ मळतो तसे मळून घ्या.
चकलीच्या सोरयाला आतून थोडे पाणी लावून त्यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा ठेवून बटर पेपरवर चकली पाडून घ्या.
कढईमधे तेल गरम करून मध्यम आचेवर चकली छान तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व चकल्या बनवून तळून घ्या. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.