बटर चकली: बटर चकली ही छान कुरकुरीत लागते. बटर चकली बनवतांना तांदळाचे पीठ, बेसन, फुटाणा डाळीचे पीठ, लाल मिरची पावडर, हिंग व जिरे वापरले आहेत. तांदळाचे पीठ हे चांगले बारीक दळलेले घ्यावे. दिवाळी फराळासाठी एक चविष्ट चकली.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २५-३० बनतात
साहित्य:
२ कप तांदळाचे पीठ
३ टे स्पून फुटणा डाळ (पीठ)
१/२ कप बेसन
२ १/२ टे स्पून बटर
१ टी स्पून लाल मिरची पावडर
एक चिमुट हिंग
३/४ टी स्पून जिरे
मीठ चवीने
कृती:
एका बाजूला विस्तवावर कढईमधे तेल गरम करायला ठेवा. एका परातीत तांदळाचे पीठ, फुटणा डाळीचे पीठ, बेसन, बटर, हिंग, जिरे, लाल मिरची पावडर व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. मग पीठामध्ये थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या.
चकलीच्या सोऱ्याला आतून पाणी लावून घ्या व त्यामध्ये मळलेल्या पिठाचा एक गोळा घालून सोरया बंद करा. एक स्वच्छ ओले कापड घेऊन त्या कापडावर गोल आकाराच्या चकल्या करून घ्या. तेल तापल्यावर हळुवारपणे चकली गरम तेलामध्ये सोडा व मध्यम विस्तवावर सोनेरी रंगावर बटर चकली तळून घ्या.
Thanks for giving us useful information, if you see more check this site 10 Best Food Items to Boost your Immunity in COVID-19 and improve your immunity power at Home during quarantine.