मुरकु: मुरकु ही एक दक्षिणेकडील चकलीच्या प्रकाराची एक डीश आहे. आपण जसे दिवाळीच्या फराळामध्ये चकली बनवतो तसेच ते मुरकु बनवतात. मुरकु हे तांद्ळ व उडीदडाळ पासून बनवतात. तसेच ह्यामध्ये नारळाचे दुध घालतात. तामिळ लोक हे मुरकु खोबरेल तेलामध्ये तळतात त्यामुळे ते छान चवीस्ट लागतात.
मुरकुची भाजणी बनवण्यासाठी:
साहित्य:
४ कप तांदूळ
१ कप उडीदडाळ
१ टे स्पून जिरे
कृती: तांदूळ सावलीत चागले सुकवून घ्या. मग परतून घ्या. उडीदडाळ गुलाबी रंगावर भाजून घ्या. जिरे थोडे भाजून घ्या. थंड झाल्यावर दळून आणा.
मुरकु बनवण्यासाठी
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ६०-७० बनवतात
साहित्य:
दळलेली भाजणी
१/२ टी स्पून हिंग,
मीठ चवीने
१ कप नारळाचे दुध
पाणी आवश्यकते नुसार
१/४ कप लोणी
खोबरेल तेल मुरकु तळण्यासाठी
कृती:
एका परातीत मुरकुची दळलेली भाजणी, हिंग, मीठ, नारळाचे दुध, लोणी घालून मिक्स करून घ्या. आवश्यक असेल तेव्हडे पाणी वापरून पीठ मळून घ्या. मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन सोरयामध्ये घालावा व त्याच्या चकल्या पाडाव्यात.
कढईमधे खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवाव्यात.