डी स कुलकर्णी उद्योग समूह हा बांधकाम ह्या क्षेत्रात अगदी नावाजलेला व प्रतिष्ठित उद्योग समूह आहे. डी स कुलकर्णी हे गेल्या ३५ वर्षापासून व्यवसायात आहेत. त्यांचे विविध व्यवसाय आहेत. बांधकाम व्यवसाय हा त्यांचा मुख्य आहे. त्यांची पुणे, मुंबई व बंगलोर येथे ऑफिस आहेत.
आता बरेच दिवसान पासून डीसके उद्योग समूह ह्या विषयी चर्चा चालली आहे. कारण सगळेचजण हादरले आहेत. लोकांनी ह्या समूहामध्ये फिक्स डीपॉझीट (ठेवी) ठेवले आहेत व आता काही महिन्यान पासून व्याज दिले जात नाही त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे.
म्हणून डीपॉझीट होल्डरनी एकत्र येण्यासाठी काही whatsapp ग्रुप तयार केले आहेत. जेणे करून सर्वाना सध्या डीसके समूह मध्ये काय चालले आहे ते समजते व जे आजारी आहेत, वयानी जास्त आहेत किंवा ज्यांची तब्बेत बरी नाही, अथवा बाहेर गावी रहातात व येऊ शकत नाही. मी व माझे आई-वडील यांनी मागील २० वर्षापासून डीसके समुहा मध्ये पैसे डीपॉझीट म्हणून ठेवले आहेत. मागील वर्षा परंत(२०१६) आम्हाला वेळच्या वेळी मुदतीच्या आत व्याज मिळत होते व डीपॉझीट ची रक्कम काढायची असेल तर ८ दिवस आगोदर सांगितले की पैसे मिळायचे त्यामुळे आम्ही पण पूर्ण विश्वासाने अजून डीपॉझीट ठेवले.
माझे वडील ८६ वर्षाचे व आई ८४ वर्षाची आहे. म्हणजेच व्हेरी सिनीअर सिटीझन आहेत. त्यानी त्यांची आयुष्याची कमाई ४१. ५०, ००० रुपयांची डीपॉझीट ठेवली आहे. त्यांचे ह्या डीपॉझीट च्या व्याजावर महिना चालतो. पण आता गेल्या ७ महिन्या पासून व्याजाचा एक पैसा सुद्धा मिळाला नाही व डीपॉझीट परत मिळावे म्हणून मागणी केली तर डीपॉझीट रिन्यु करायला सांगितले. त्यांच्या म्हणण्या नुसार आम्ही डीपॉझीट रिन्यु सुद्धा केले. व्हेरी सिनीअर सिटीझन ह्यानी ह्या वयात कसे करावे जर त्याचे महिन्याचे व्याज मिळत नाहीतर. ह्या वयात औषधपाणी व ईतर खर्च सुद्धा किती असतात व तसेच मानसिक त्रास सुद्धा किती होतो. ह्याची सर्व कल्पना व्हेरी सिनीअर सिटीझना असेलच.
मी व माझे आई-वडील बऱ्याच वेळा डीसके समूहाच्या ऑफिसमध्ये गेलो. प्रतेक वेळी नवीन तारीख देऊन ह्यावेळी तुम्हाला नक्की व्याजा मिळेल असे सांगितले पण त्याप्रमाणे काही झाले नाही. माझ्या आई-वडीलांचे व्याज काही मिळाले नाही.
आम्हाला असे वाटते की:
१) डीसकेसरांनी व हेमा वहिनींनी सर्व डीपॉझीट होल्डर बरोबर मिटिंग घेऊन सत्य परिस्थिती सांगावी
२) शेडूल बनवून त्याप्रमाणे लवकरात लवकर पैसे द्यावे
३) काही सबबी सांगू नये म्हणजे डीपॉझीटरना सुद्धा विश्वास वाटेल.
४) व्हिडीओ पाठवून लोकांना आशेवर ठवू नये व चुकीच्या तारखा व आश्वासने देऊ नये.
५) काहीतरी ठोस निर्णय व तो सगळ्याना रुचेल असा करावा.
६) आम्हाला कल्पना आहे की सध्या बाजारात मंदी आहे. बरेच काही कायदे सुद्धा बदलले आहेत.
७) पण खर सांगायचे तर डीसके सरांनी आम्हाला काही व्याज दिले तर महिन्याचा खर्चतरी निघेल व आम्हाला विश्वास सुद्धा वाटेल.
आम्हाला मनापासून एक सांगावेसे वाटते की आतापर्यंत सर व वहिनी कधी कुणाला वाईट बोलले नाही व डीपॉझीटर सुद्धा डीसके समुहाचे चांगले व्हावे म्हणजे आमचे पैसे लवकर मिळतील अशीच अपेक्षा करतात.
नोट: आम्हाला जे मनापासून वाटते ते आम्ही आमचे विचार लिहिले आहेत. जर कोणाला अजून काही सुचवायचे असेलतर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये लिहावे.
The Article in English can be seen – Here