Tasty Palak Chakli Recipe in Marathi

Tasty Spinach Chakli
Tasty Palak Chakli

हेल्दी पालकची चकली: पालकची चकली ही हेल्दी आहेच व दिसायला सुद्धा छान दिसते. दिवाळी फराळामध्ये हिरव्या रंगाची चकली छान दिसेल. तसेच महाराष्ट्रात लग्नाच्या वेळी मुलीकडील बाजू मुलीला लग्नात रुखवत देतात त्यामध्ये अश्या प्रकारची चकली ठेवायला छान आहे. दिवाळी फराळासाठी एक वेगळ्या प्रकारची चकली.

बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २४ बनतात

साहित्य:
१ कप पालक पेस्ट
१ कप ज्वारीचे पीठ
१ कप तांदळाचे पीठ
१/२ टी स्पून लसूण पेस्ट
१ टे स्पून तीळ
१ टी स्पून जिरे (कुटून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून अनारदाना पावडर
२ टे स्पून तेल (गरम मोहन)
मीठ चवीने
तेल चकली तळण्यासाठी

Tasty Spinach Chakli
Tasty Palak Chakli

कृती: प्रथम पालक धुऊन, उकडून पेस्ट करून घ्या. मग पालक पेस्ट, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, लसूण पेस्ट, तीळ , जिरे, लाल मिरची पावडर, अनारदाणा पावडर मिक्स करून त्यामध्ये कडकडीत तेल घालून चांगले मिक्स करून घ्या. जेव्हडे हवे तेव्हडे पाणी वापरून पीठ मळून घ्या. पीठ फार घट्ट मळू नका. चकलीच्या सोरयाला आतून पाणी लावून त्यामध्ये पीठ घालून सोरया बंद करून घ्या. एका प्लास्टिकच्या पेपरवर चकल्या पाडून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घेऊन त्यामध्ये ३-४ चकल्या सोडून विस्तव मध्यम आचेवर ठेवून चकल्या तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व चकल्या बनवून तळून घ्या.
थंड झाल्यावर प्लास्टिक पिशवीत भरून डब्यात ठेवा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.