चिकन नगेट्स: चिकन नगेट्स ही एक छान स्टार्टर रेसिपी आहे. लहान मुलांना ही डीश खूप आवडते. मुलांच्या वाढदिवसाला पार्टीला बनवायला छान आहे. चिकन नगेट्स बनवायला सोपे आहेत व टेस्टी लागतात. चिकन नगेट्स बनवण्यासाठी बनवण्यासाठी बोनलेस चिकन वापरले आहे. फक्त १५-२० मिनिट दही, लाल मिरची पावडर, मीठ व धने-जिरेपूड लावून ठेवले व मैदा, फेटलेले अंडे व ब्रेड क्रम मध्ये घोळून छान कुरकुरीत तळून घेतले.
The English language version of the same chicken recipe can be seen here – Crisp Chicken Nuggets
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
८ मोठे बोनलेस चिकनचे तुकडे
१/२ कप दही
१ टे स्पून लाल मिरची पूड
१ टी स्पून धने-जिरे पूड
मीठ चवीने
१ कप मैदा
२ अंडी (फेटून)
४ ब्रेड स्लाईसक्रम
तेल चिकन नगेट्स तळण्यासाठी
कृती: चिकनचे तुकडे धुऊन घेऊन घ्या. एका मध्यम आकाराच्या बाऊलमध्ये चिकनचे तुकडे, दही, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करून १५-२० मिनिट बाजूला ठेवा.
एका बाऊलमध्ये अंडी फेटून घ्या. दुसऱ्या बाऊलमध्ये मैदा व तिसऱ्या बाऊलमध्ये ब्रेडक्रम ठेवा.
चिकनचा एक पीस घेऊन मैद्याच्या बाऊलमध्ये घोळून घ्या. मग फेटलेल्या अंड्याच्या बाऊलमध्ये बुडवून घेऊन मग ब्रेडक्रम मध्ये घोळून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घेऊन चिकनचे तुकडे मध्यम विस्तवावर कुरकुरीत तळून घ्या.
चिकन नगेट्स गरम गरम सर्व्ह करा व बरोबर टोमाटो सॉस अथवा पुदिना चटणी बरोबर द्या.