चॉकलेट मालपुवा: मालपुवा ही एक स्वीट डीश आहे. उत्तर हिंदुस्थान मधील लोकप्रिय डीश आहे. मालपुवा ही डीश आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवु शकतो. मालपुवाबनवायला सोपा व झटपट होणारा आहे.
The English language version of this Malpua recipe can be seen here – Chocolate Malpua
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य: रबडी बनवण्यासाठी:
१ लिटर दुध
१/२ कप साखर
१ टी स्पून वेलचीपूड
मालपुवा बनवण्यासाठी:
१/२ कप चॉकलेट कंपाऊंड
३/४ कप मैदा
२ टे स्पून साखर
१/ ४ कप दुध
ड्रायफ्रुट सजावटीसाठी
तूप मालपुवा शालो फ्राय करण्यासाठी
कृती: रबडी बनवण्यासाठी: जाड बुडाच्या पसरट भांड्यात दुध थोडे दाट होई परंत आटवून घ्या. दुध आटवून झाले की त्यामध्ये साखर व वेलचीपूड घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर गरम करून थंड करायला ठेवा.
मालपुवा बनवण्यासाठी: चॉकलेट कंपाऊंड डबल बॉईल सिस्टीमनी विरघळवून घेऊन थोडेसे थंड झाल्यावर त्यामध्ये मैदा, साखर, दुध घालून मिश्रण बनवून घ्या.
नॉन स्टिक पॅन गरम करून घ्या मग थोडे तूप घालून त्यावर बनवलेल्या मिश्राणाची छोटी-छोटी धिरडी घालून शालो फ्राय करा.
गरम गरम मालपुवा सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरतून बनवलेली रबडी घालून ड्रायफ्रुटनी सजवा.